श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) शेजारी असलेल्या तुलैल गावात शाळेच्या इमारतीसाठी बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने गुरुवारी एक कोटी रुपयांची देणगी दिली. अभिनेता अक्षय दुपारच्या सुमारास प्रथम हेलिकॉप्टरमधून नीरू गावात पोहोचला आणि नंतर स्थानिक लोकांशी संवाद साधला आणि तैनात सुरक्षा दलांतील जवानांशी संवाद साधला.
सूत्रांनी सांगितले की, “तुलैलमधील नीरू गावात शालेय इमारतीच्या बांधकामासाठी अक्षय कुमारने एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तैनात सैन्य कर्मचारी आणि बीएसएफ जवानांच्यासोबत त्याने बराच वेळ गप्पामध्ये घालवला. जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी त्याने या भागाला भेट दिली. अक्षयला भेटायला तेथे जमलेल्या स्थानिक लोकांबरोबर त्याने नाचदेखील केला. नीरू गावात एलओसी पोस्टवर तैनात बीएसएफ जवानांनी हा सोहळा आयोजित केला होता. "