महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अक्षय कुमारने पंतप्रधान निधीसाठी जाहीर केली मोठी रक्कम - Akshay Kumar nin news

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने पंतप्रधान निधीसाठी २५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याने ट्विटरवरुन ही माहिती दिलीय.

Akshay Kumar
अक्षय कुमार

By

Published : Mar 28, 2020, 9:02 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधीची मोठी आवश्यकता आहे. यासाठी सर्वच स्तरातून देणगीदार पुढे येत आहेत. अनेक कलाकारांनी यासाठी सढळ हस्ते मदत देऊ केली आहे. अशा मदतीच्या बाबतीत नेहमी पुढे असणारा अभिनेता अक्षय कुमारनेही मोठ्या रक्कमेची मदत पंतप्रधान निधीसाठी दिली आहे.

अक्षय कुमारने पंतप्रधान निधीसाठी २५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याने ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. त्याने लिहिलंय, ''आयुष्याचा प्रश्न असलेला हा काळ आहे. जे आम्हाला करता येईल ते केले पाहिजे. मी माझ्या बचतीतील २५ कोटी रुपये पंतप्रधान निधीसाठी देण्याची प्रतिज्ञा करीत आहे. या जीवन वाचवूया. जान है तो जहान है.''

अभिनेता प्रभास याने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ४ कोटी रुपयांची मदत दिली आहे. प्रभासने गुरूवारी यापैकी ३ कोटी रुपये पंतप्रधान मदत निधी आणि आंध्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्री निधीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये दिले आहेत. कमल हासनने आपले घर रुग्णालयासाठी देण्याचे ठरवले आहे. पवन कल्याण २ कोटी, महेश बाबू १ कोटी, अलु अर्जुन २५ लाखर रामचरण ७० लाख, कपील शर्माने ५० लाख रुपये देऊ केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details