मुंबई - एकापाठोपाठ हीट चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. खिलाडच्या 'बेल बॉटम' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाच्या टीमसोबत पहाटे पाऊणे सहा वाजता अक्षयने एक व्हर्चुअल मिटींग घेतली.
लॉकडाऊनही अक्षयला रोखू शकत नाही, 'बेल बॉटम' टीमची व्हर्चुअल मिटींग पडली पार - बेल बॉटम' टीमची व्हर्चुअल मिटींग
खिलाडच्या 'बेल बॉटम' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाच्या टीमसोबत पहाटे पाऊणे सहा वाजता अक्षयने एक व्हर्चुअल मिटींग घेतली. या व्हिडिओ मिटींगध्ये दिग्दर्शक रंजित एम तिवारी, लेखक असीम अरोरा, निर्माते वशू भगनानी, जॅकी भगनानी आणि निखील अडवाणी सहभागी होते.
या व्हिडिओ मिटींगध्ये दिग्दर्शक रंजित एम तिवारी, लेखक असीम अरोरा, निर्माते वशू भगनानी, जॅकी भगनानी आणि निखील अडवाणी सहभागी होते. या व्हिडिओ चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत निखीलने लिहिलं, अक्षयसाठी लॉकडाऊनमध्येही काहीही बदललं नाही. बेल बॉटमचे फाइनल नरेशन पाऊणे सहा वाजता सुरु.
नुकतंच अक्षयने लॉकडाऊनबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या एका मोहिमेसाठी काम केले होते. चित्रपट निर्माता बल्की यांच्या सहकार्याने अक्षयने भारत सरकारसाठी हा व्हिडिओ बनवला होता. याचं चित्रीकरण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत करण्यात आले होते.