मुंबई - अभिनेता अक्षय कुमार भाजपच्या वतीने निवडणूक लढवणार असल्याची चर्चा काल रात्रीपासून रंगली होती. त्याचे कारणही होते, त्याने काल रात्री केलेले एक ट्विट. आपण पहिल्यांदाच एका अनोळख्या गोष्टीसाठी तयारी करीत असल्याचे त्याने ट्विटरवर म्हटले होते. अशा प्रकारचे काम पूर्वी कधीच केले नाही. त्यामुळे थोडा नर्व्हस आणि उत्साही आहे. अपडेटसाठी चौकस रहा, अशा आशयाचे हे ट्विट होते. याचा अर्थ तो लोकसभेच्या निवडणूकीची तयारी करीत असल्याचा तर्क करण्यात आला होता.
निवडणूक लढवण्याबाबत अक्षय कुमारने केला चकित करणारा खुलासा - Gurudaspur
अक्षय कुमार लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची कालपासून चर्चा होती...आपल्या ट्विटचा भलताच अर्थ काढल्याचे त्याने म्हटलंय...आपण निवडणूक लढवणार नसल्याचाही खुला त्याने ट्विटरवर केलाय....
अक्षयच्या ट्विटनंतर अफवांना उधाण आले. तो पंजाबच्या गुरुदासपूरहून लोकसभेचे निवडणूक भाजपच्या वतीने लढवणार असल्याचा तर्क बांधण्यात आला. त्याचे कारणही अक्षयच्या नेहमीच्या व्यवहारात आहे. तो मोदी समर्थक कलाकारांपैकी एक मानला जातो. त्यामुळे तो निवडणूक भाजपकडून लढवेल अशी अटकळ होती.
मात्र त्याने केलेल्या ट्विटचा वेगळा अर्थ निघाल्याचे त्याच्या आज लक्षात आले. त्यामुळे नवे ट्विट करुन त्याने यावर खुलासा केलाय. आपण लोकसभेची निडणूक लढवत नसून माझ्या ट्विटचा भलताच अर्थ काढला गेल्याचे त्याने म्हटलंय