महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा ट्रेलर ९ फेब्रुवारीला होणार रिलीज - bachchan Pandey Trailer

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख समोर आली आहे. होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बच्चन पांडे
बच्चन पांडे

By

Published : Jan 29, 2022, 7:29 PM IST

मुंबई- अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बच्चन पांडे या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज डेट समोर आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. हा चित्रपट यावर्षी 18 मार्चला रिलीज होणार आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, बच्चन पांडे या चित्रपटाचा ट्रेलर ९ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. वृत्तानुसार, बच्चन पांडेच्या टीमने ठरवले आहे की ते 9 फेब्रुवारीला अक्षय कुमारच्या चाहत्यांना ही भेट देणार आहेत. बच्चन पांडे हा चित्रपट अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि ड्रामाने भरलेला असल्याचं म्हटलं जातंय. हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे.

अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांच्याशिवाय जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी, स्नेहल दाबी, पंकज त्रिपाठी, प्रतीक बब्बर आणि अभिमन्यू सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत.

याआधी अक्षय कुमार आनंद एल रॉय दिग्दर्शित अतरंगी रे या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सारा अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष मुख्य भूमिकेत होते. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता.

अक्षय कुमारच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये गोरखा, राम सेतू, पृथ्वीराज, रक्षाबंधन आणि सेल्फीसह अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा -प्रभासचा 'आदिपुरुष' 20 हजार स्क्रीन आणि जगभरात 15 भाषांमध्ये रिलीज होणार

ABOUT THE AUTHOR

...view details