मुंबई- बॉलिवूडचे सुंदर जोडपे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला सोमवारी (17 जानेवारी) 21 वर्षे पूर्ण झाली. ट्विंकल आणि अक्षयने २००१ साली लग्न केले होते. यानिमित्ताने ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री आणि लेखिका असलेल्या ट्विंटकलने एक फोटो देखील पोस्ट केला आहे, जो खूप सुंदर आहे.
या फोटोत अक्षय कुमार खुर्चीवर बसला असून त्याची पत्नी ट्विंकल देखील कॅज्युअल लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे. हा फोटो रणथंबोर नॅशनल पार्कमधील आहे. इथे हे जोडपे त्यांची मुलगी नितारासोबत सुट्टीसाठी पोहोचले आहे.
हा फोटो शेअर करत ट्विंकलने तिचा पती अक्षयसोबत घडलेल्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. ट्विंकलने लिहिले, 'आमच्या 21 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आमच्यात संभाषण झाले...... मी : ''तुला माहिती आहे, आपण इतके वेगळे आहोत की आम्ही जर एखाद्या पार्टीत भेटलो तर मला माहिती नाही की तुझ्याशी बोलू शकेन की नाही.''
तो : मी तुझ्यासोबत नक्की बोलेन.