मुंबई- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नुकताच 'केसरी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर आता अक्षयने आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरूवात केली आहे. 'लक्ष्मी बॉम्ब' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे.
कियारा-अक्षयने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला केली सुरूवात, फोटो केला शेअर - hindi remake
चित्रपटात 'एम.एस.धोनी' फेम अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयच्या अपोझिट झळकणार आहे. कियाराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे
या चित्रपटात 'एम.एस.धोनी' फेम अभिनेत्री कियारा अडवाणी अक्षयच्या अपोझिट झळकणार आहे. कियाराने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. हा चित्रपट २०११ मध्ये आलेल्या मुनी २: कंचना या हॉरर कॉमेडी तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार असल्याचे म्हटले जात आहे.
या चित्रपटात कियारा आणि अक्षयशिवाय अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान कियारा लवकरच 'कबीर सिंग' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 'अर्जून रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. तर अक्षय 'गुड न्यूज' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.