मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगण गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शन करणार असलेल्या या चित्रपटात आलिया भट्ट गंगुबाईची भूमिका साकारणार असल्याचे यापूर्वीच निश्चित झाले होते. आता या स्टारकास्टमध्ये अजयचा समावेश झाला आहे.
अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी बाजीराव मस्तानी या चित्रपटात एकत्र येणार होते. मात्र अजयच्या इतर जबाबदारीमुळे ते शक्य झाले नव्हते. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. मात्र गेली २० वर्षे ते एकत्र आलेले नाहीत. आता भन्साळींच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात भूमिका करण्याचे अजय देवगणने मान्य केले आहे. यात त्याची भूमिका छोटी असली तरी खूप प्रभावी असणार आहे.