मुंबई- शतकातील महानायक अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींचा जन्म 1942 मध्ये प्रयागराज (अलाहाबाद) उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्य बॉलिवूडमधून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. बच्चन यांना सह-कलाकार अजय देवगण आणि गायक अदनान सामी यांनी सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजय आणि अदनान दोघांनी अभिनंदन संदेशांसह दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत.
अजय देवगणच्या सदिच्छा
बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणने बिग बींना यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ट्विटरवर दिल्या आहेत त्याने लिहिलंय, 'सर, तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहून खरा कलकार कसा असावा याची मला शिकवण मिळते. अमित जी.' अजयने बच्चन यांचे अभिनंदन करीत एक फोटोही शेअर केलाय. हा फोटो त्यांच्या आगामी 'मे डे' चित्रपटातील आहे. अजय आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यात 'मेजर साहब', 'खाकी', 'हम किसी से कम नहीं', 'हिंदुस्तान की कसम' आणि 'सत्याग्रह' या चित्रपटांचा समावेश होतो.