महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भन्साळींच्या 'बैजू बावरा'मध्ये अजय देवगण साकारणार तानसेनची भूमिका? - भन्सळी दिग्दर्शित बैजू बावरा

बैजू बावरा या चित्रपटात दिग्गज भारतीय संगीतकार तानसेनची भूमिका साकारण्यासाठी संजय लीला भन्साळी अजय देवगणसोबत चर्चा करत आहेत. देवगणने अद्याप चित्रपटाला ग्रीन सिग्नल दिलेला नसला तरी, भन्साळींसोबत त्याचे पुनर्मिलन होण्याची शक्यता जास्त आहे.

संजय लीला भन्साळी आणि अजय देवगण
संजय लीला भन्साळी आणि अजय देवगण

By

Published : Mar 16, 2022, 3:27 PM IST

मुंबई - अजय देवगण 23 वर्षांनंतर संजय लीला भन्साळी यांच्या अलीकडे रिलीज झालेल्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटात झळकला होता. आता भन्साळी आगामी बैजू बावरा या चित्रपटावर काम करीत असून यातील मुख्य भूमिकेसाठी त्यांनी अजय देवगणसोबत चर्चा सुरू केली आहे.

संजय लीला भन्साळी यांनी 2019 मध्ये बैजू बावराची घोषणा केली होती. हा चित्रपट 2021 च्या दिवाळीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता पण कोविड महामारीमुळे सर्व योजनेवर पाणी फिरले होते. गंगूबाई काठियावाडीच्या रिलीजनंतर मिळालेल्या यशामुळे चित्रपट निर्मात्याला आनंद झाला आहे. भन्साळी आता त्यांचा पेट प्रोजेक्ट पुन्हा रुळावर आणण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत.

वृत्तानुसार, भन्साळी या चित्रपटात दिग्गज भारतीय संगीतकार तानसेनची भूमिका साकारण्यासाठी अजयसोबत चर्चा करत आहेत. देवगणने अद्याप चित्रपटाला ग्रीन सिग्नल दिलेला नसला तरी, भन्साळींसोबत त्याची पुनर्मिलन होण्याची शक्यता जास्त आहे. अजय आणि एसएलबी यांनी पहिल्यांदा 1999 च्या ब्लॉकबस्टर 'हम दिल दे चुके सनम'मध्ये एकत्र काम केले होते.

संजय लीला भन्साळी आणि अजय देवगण

तानसेनच्या भूमिकेत अजयच्या भूमिकेचे कारण म्हणजे गंगूबाई काठियावाडीच्या यशात त्याने दिलेले योगदान. अजयला बैजू बावरा मध्ये तानसेनची भूमिका देण्यासाठी भन्साळी उत्सुक आहेत कारण त्या भूमिकेत ग्रे रंगाची छटा आहे आणि दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार, देवगण कधीही आव्हानात्मक भूमिका साकारण्यास घाबरत नाही.

संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंग

आधी कळवल्याप्रमाणे रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भारत भूषण यांनी 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या बैजू बावरा या चित्रपटात ही भूमिका साकारली होती. निर्मात्यांनी अद्यापही संगीत गाथा असलेल्या या चित्रपटात रणवीरच्या कास्टिंगची घोषणा केलेली नाही.

आगामी बैजू बावरा चित्रपटाद्वारे संजय लीला भन्साळी त्यांचे पहिले पूर्ण संगीताचे दिग्दर्शन करणार आहेत. दोन गायकांची कथा असलेल्या बैजू बावरा या चित्रपटात जवळपास डझनभर गाणी असतील. बैजू बावरा हे संगीत म्हणून त्यांचे सर्वात मोठे आव्हान असेल, असे भन्साळी यांनी यापूर्वी सांगितले होते. "नौशाद साहेबांनी 1952 मध्ये बैजू बावरामध्ये केलेल्या जबरदस्त संगीताचा मी विचारही करत नाही. ती उंची गाठणे अशक्य आहे," असे भन्साळी म्हणाले होते. पण गोलियों की रासलीला: राम-लीला (२०१३) पासून अधिकृतपणे स्वत:च्या चित्रपटांसाठी संगीत देण्यास सुरुवात करणारा देवदास दिग्दर्शक स्वत:चा सर्वोत्तम शॉट देण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा -'द काश्मीर फाइल्स' वाद : अनुपम खेर यांच्या खुलाशाने कपिल शर्माचा जीव भांड्यात पडला

ABOUT THE AUTHOR

...view details