महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गलवान व्हॅलीच्या घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार अजय देवगण - अजय देवगण

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण गलवान व्हॅलीची घटना मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी तयार आहे. निर्मितीच्या क्षेत्रात उतरलेल्या अजय देवगणने सिनेमा बनवण्याची तयारी केली असली तरी तो यात काम करणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Ajay Devgn
अजय देवगण

By

Published : Jul 4, 2020, 2:55 PM IST

मुंबईः लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्याने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्यावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यास अभिनेता-निर्माता अजय देवगण तयार आहेत.

या चित्रपटामध्ये चिनी सैन्याशी लढा देणाऱ्या 20 भारतीय सेनेच्या जवानांच्या बलिदानाची कहाणी दाखवली जाणार आहे.

अजय या चित्रपटात काम करेल की नाही हे समजू शकले नाही. कलाकार आणि इतर तंत्रज्ञांची यादी अंतिम टप्प्यात आहेत. चित्रपटाची सह-निर्मिती अजय देवगण एफफिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज एलएलपी करणार आहेत.

15 जून रोजी, पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्यासह झालेल्या हिंसक चकमकीत 20 भारतीय सैनिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर देशभर संतापाची लाट निर्माण झाली होती.

१९७५ नंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या बाबतीत घडलेली ही पहिली दुर्घटना होती. १९७५ ला अरुणाचल प्रदेशमध्ये असी चकमक यापूर्वी झाली होती.

हेही वाचा - #ब्रेक द साइलेन्स फॉर सुशांत : सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी ट्विटर ट्रेंड

अजय लवकरच भुजः प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क आणि शरद केळकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अभिषेक दुधैया यांनी याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. लवकरच चित्रपटाचा डिजीटल प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details