मुंबई -अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या आगामी 'थँक गॉड' चित्रपटासाठी शूटिंगला सुरूवात करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घेता येईल याच्या योजनेवर अजय विचार करीत आहे. कोरोनाच्या साथीच्या काळात सप्टेंबरमध्ये शूटिंग करण्याचा त्याने निर्णय घेतला आहे.
इंद्र कुमार दिग्दर्शित हा विनोदी चित्रपट सॉर्ते कुगलर या डॅनिश चित्रपटाचा रिमेक असल्याचे म्हटले जाते. कित्येक वर्षांपासून इंद्रकुमार या प्रकल्पाची पटकथा लिहित आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण 10 एप्रिलपासून सुरू होणार होते, पण सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे वेळापत्रक सप्टेंबरमध्ये वाढविण्यात आले आहे.