मुंबई- सुपरस्टार अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची प्रिय मुलगी, न्यासा देवगण नेहमीच चर्चेपासून दूर राहिली आहे.न्यासाचे इन्स्टाग्राम अकाऊंट खासगी असतानाही तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसते. यात ती बॉलिवूडच्या गाजलेल्या गाण्यावर वर्गमित्रांसह थिरकताना दिसत आहे.
स्टार किड्स नेहमीच हौशी फोटोग्राफर्सच्या निशाण्यावर असतात. यांच्यासंबंधी सोशल मीडियावर येणारी प्रत्येक गोष्ट चर्चेत असते. सिंगापूरमधील दक्षिण पूर्व आशियाच्या युनाइटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकत असलेली न्यासा देवगण प्रसिध्दीपासून स्वतःला दूर ठेवत असते.