महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तान्हाजी'ला एक वर्ष पूर्ण, अजय, काजोलने टीमसह केला जल्लोष - Ajay Devgn, Kajol

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाले. कोरोनाचा काळ सुरू होण्यापूर्वी सर्वाधिक कमाई करणारा हा बॉलिवूडचा एकमेव चित्रपट ठरला होता. ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय सह-निर्मित 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा अजयचा १०० वा चित्रपट आहे. चित्रपटाच्या एक वर्ष पूर्तीचा जल्लोष साजरा करण्यासाठी संपूर्ण टीम एकत्र आली आहे.

'Tanhaji: The Unsung Warrior'
'तान्हाजी'ला एक वर्ष पूर्ण,

By

Published : Jan 11, 2021, 3:57 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार्स अजय देवगण आणि काजोलने आपल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या एक वर्ष पूर्तीचा जल्लोष साजरा केला. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे चित्रपटगृहे बंद होण्यापूर्वी हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता.

अजयने रविवारी ट्विटरवर लिहिलं, " तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हिरोने बॉक्स ऑफिसवर धमाका करुन मला व एडी फिल्मला मदत केली. त्यानंतर सुरू झालेल्या महामारीमुळे पूर्ण वर्ष थांबल्यासारखे झाले. सिनेमाला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने सर्व कलाकार, दिग्दर्शक आणि पूर्ण टीमसह या वीर योद्ध्याच्या यशाचे पुन्हा एकदा जल्लोष साजरा करीत आहे.''

अजयने चित्रपटाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

हाच व्हिडिओ काजोलने तिच्या वॉलवरही शेअर करीत की हे वर्ष आत्तापर्यंतचे सर्वात मोठे वर्ष होते.

ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय सह-निर्मित 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा अजयचा १०० वा चित्रपट आहे. हा चित्रपट मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे.

हेही वाचा - बॉलिवूड ट्विट प्रकरण; कंगनाला मुंबई उच्च न्यायलयाचा दिलासा कायम

ABOUT THE AUTHOR

...view details