मुंबई - 'तान्हाजी' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर अजय देवगणच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. 'मैदान' या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. लवकरच याच्या टीझरची प्रतीक्षा आहे.
'मैदान' या चित्रपटाच्या पोस्टरवर फुटबॉलच्या मैदानात भर पावसाळ्यात हातात बॉल घेऊन एकमेकांशी भिडायला सज्ज असलेला मुलांचा संघ दिसतो. चिखलाने सर्वजण माखले आहेत. एक मोठा आत्मविश्वास आणि जिद्द सर्वांच्या बॉडिलँग्वेजमध्ये दिसत आहे.
अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' हा चित्रपट मे महिण्यात रिलीज होणार आहे. यातही झोपडपट्टीमध्ये वाढलेल्या मुलांचे फुटबॉल प्रेम पाहायला मिळेल. काहीसे साम्य 'झुंड' आणि 'मैदान'मध्ये असू शकते. दोन्ही चित्रपट सत्यकथेवर आधारित आहेत.
अजय देवगणच्या 'मैदान'मध्ये कलाकार कोण असणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे. झी स्टुडिओ आणि बोनी कपूर, अकाश चावला आणि अर्णव जॉय सेनगुप्ता यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
'मैदान' चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा यांचे असून पटकथा आणि संवाद सैविन कुद्रास आणि रितेश शाह यांचे आहे. २७ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.