महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अजयनं पूर्ण केलं मैदानच्या फर्स्ट शेड्यूलचं चित्रीकरण, फुटबॉल स्पर्धेवर आधारित सिनेमा - बधाई हो

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली होती. आता या चित्रपटाच्या फर्स्ट शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण मुंबईत करण्यात आलं

अजयनं पूर्ण केलं मैदानच्या फर्स्ट शेड्यूलचं चित्रीकरण

By

Published : Sep 6, 2019, 5:30 PM IST

मुंबई- बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत खेळावर आधारित बरेचसे चित्रपट पाहायला मिळाले. आता फुटबॉल स्पर्धेवर आधारित 'मैदान' हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली होती. आता या चित्रपटाच्या फर्स्ट शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे.

हेही वाचा - करण देओलच्या सिनेमाबद्दल सलमाने केले ट्विट, सनी देओलने दिले प्रत्युत्तर

चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण मुंबईत करण्यात आलं. चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचं चित्रीकरण या महिन्याच्या शेवटी सुरु होईल. १९५२ ते १९६२ हा भारतीय फुटबॉलचा सुवर्ण काळ मानला जातो. या चित्रपटातूनही फुटबॉल स्पर्धेचा थरार पडद्यावर पाहायला मिळेल.

अजय देवगनसोबत या चित्रपटात किर्थी सुरेश ही अभिनेत्री झळकणार आहे. तर, 'बधाई हो' चित्रपटाचे दिग्दर्शक रविंद्रनाथ शर्मा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुनवा जॉय सेनगुप्ता हे या चित्रपटाची निर्माती करत आहेत. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा - शाहिद कपूरचा लेक झाला एका वर्षाचा, मीराने शेअर केला क्युट फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details