महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग म्हणताहेत ‘थँक गॉड’! - अजय देवगण रकुल प्रीत सिंग

अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग सोबत म्हणतोय ‘थँक गॉड‘. त्याचे कारण असे की ‘थँक गॉड‘ हे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून त्याचे शूटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांचे असून साधारण वर्षभराच्या दिरंगाईने शूटिंग सुरु होत आहे.

‘थँक गॉड’ चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात
‘थँक गॉड’ चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात

By

Published : Jan 22, 2021, 2:16 AM IST

मुंबई - एखादी वाईट गोष्ट होण्यापासून राहिली तर शहरी लोक आंग्ल भाषेचा आधार घेत म्हणतात, ‘थँक गॉड, ते घडले नाही’. खरंतर आपण सर्वच जण कुठल्या ना कुठल्या कारणासाठी देवाचे आभार मनात असतो. असो. आता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग सोबत म्हणतोय ‘थँक गॉड‘. त्याचे कारण असे की ‘थँक गॉड‘ हे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून त्याचे शूटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांचे असून साधारण वर्षभराच्या दिरंगाईने शूटिंग सुरु होत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात ‘थँक गॉड‘ चे चित्रीकरण सूर होणार होते परंतु जगभरात कोरोनाच्या पडलेल्या विळख्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते.

गेल्यावर्षीपेक्षा आता परिस्थिती थोडीफार सुधारली असून ‘थँक गॉड‘ च्या टीमने प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळत चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. ‘न्यू नॉर्मल’ मध्ये शूटिंग करणे आता कलाकारांच्या अंगवळणी पडत चालले असून तेसुद्धा योग्य काळजी घेत चित्रीकरण करीत आहेत. एक छोटेखानी मुहूर्त करून ‘थँक गॉड‘ च्या टीमने नारळ वाढवला.

‘थँक गॉड’ चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात
या शुभमहूर्त प्रसंगी मार्कंड अधिकारी, रुद्र पंडित, आनंद पंडित, अशोक ठाकेरिया, भूषण कुमार, इंद्र कुमार, सिद्धार्थ मल्होत्रा, बाळू मुन्नंगी, सुनीर खेतरपाल, दीपक मुकुट, विनोद भानुशाली आणि शिव चना उपस्थित होते. श्री बाळू मुन्नंगी यांनी मुहूर्ताचा क्लॅप दिला. अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग अभिनीत हा एक नर्मविनोदी चित्रपट आहे ज्यात जीवनाचा लेखाजोखा विनोदी पद्धतीने मांडण्यात येणार आहे. टी-सीरिज फिल्म्स आणि मारुती इंटरनॅशल प्रॉडक्शन ची निर्मिती असलेल्या ‘थँक गॉड’ चे दिग्दर्शन विनोदी-ड्रामा चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले इंद्र कुमार करत आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठाकरिया, सुनीर खीटरपाल, दीपक मुकुट, आनंद पंडित आणि मार्कंद अधिकारी हे निर्माते असून यश शाह यांनी सह-निर्मिती केली आहे.‘थँक गॉड‘ याच वर्षी चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details