नाशिक- अजय देवगन यांनी आज नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंडात वडील वीरू देवगण यांच्या अस्थींचे विसर्जन केले. गुरुजी सतीश शुक्ला यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून प्रवाहित गोदावरी नदीत वीरू देवगण यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. वीरू यांचं २७ मे रोजी मुंबई येथे निधन झालं होतं.
अजयने नाशिकच्या पवित्र रामकुंडात विसर्जित केल्या वीरू देवगण यांच्या अस्थी - ramkund
गुरुजी सतीश शुक्ला यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून प्रवाहित गोदावरी नदीत वीरू देवगण यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. वीरू यांचं २७ मे रोजी मुंबई येथे निधन झालं होतं.
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वीरू देवगण हे बॉलिवूडमधील सर्वात जुने अॅक्शन डायरेक्टर होते. त्यांनी मिस्टर नटवरलाल, दस नंबरी, क्रांती, राम तेरी गंगा मैली, आखरी रास्ता, स्वर्ग से सुंदर, फुल और काटे , इश्क अशा 80 हून अधिक चित्रपटांत अॅक्शन दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
अस्थी विसर्जनावेळी अजय देवगणला पाहण्यासाठी चाहत्यांनी रामकुंड परिसरात मोठी गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.