मुंबई - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ५ जानेवारीला काही बुरखाधारी गुंड शिरले होते. त्यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली होती. यावर देशभर आंदोलन उभे राहिले. दरम्यान दीपिका पदुकोणने जेएनयूमध्ये जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मात्र, तिच्या 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न काही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी केला होता. 'छपाक'सोबत अजय देवगणचा 'तान्हाजी' हा चित्रपटही रिलीज झाला होता. अजयने जेएनयू प्रकरणावर आत्तापर्यंत भाष्य करणे टाळले होते. आज त्याने ट्विट करत आपली भूमिका मांडली.
अजयने ट्विटरवर लिहिलंय, ''योग्य पुरावे येण्याची प्रतिक्षा केली पाहिजे हे मी नेहमी पाळत आलोय. जाणून बुजून बेफिकीरपणे पुढे न जाता सर्वांनी शांततेने बंधुभाव जपत पुढे जावे, असे आवाहन मी करतो आहे.''