महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान अजय देवगण, अक्षय कुमारने केलं चाहत्यांना खास आवाहन - Sooryavanshi news

'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमारसोबत अजय देवगण 'सिंघम' तर, रणवीर सिंग 'सिंबा' म्हणून एन्ट्री घेणार आहेत. ट्रेलरमध्ये तिघांचीही दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे.

Ajay-Akshay request fans to not be at loggerheads with each other
'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान अजय देवगन, अक्षय कुमारने केलं चाहत्यांना खास आवाहन

By

Published : Mar 3, 2020, 10:40 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर अखेर २ मार्चला प्रदर्शित झाला. मुंबईत अक्षय कुमार, अजय देवगण, रणवीर सिंग, करण जोहर, कॅटरिना कैफ आणि रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी चित्रपटाच्या टीमने माध्यमांशी संवाद साधला.

'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमारसोबत अजय देवगन 'सिंघम' तर, रणवीर सिंग 'सिंबा' म्हणून एन्ट्री घेणार आहेत. ट्रेलरमध्ये तिघांचीही दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. या तिघांचीही सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. तिघांचेही वेगवेगळे फॅनक्लब सोशल मीडियावर त्यांचे अपडेट्स शेअर करत असतात. मात्र, कधी कधी त्यांच्या चाहत्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा पाहायला मिळते. याबाबत अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनी आपल्या चाहत्यांना एक आवाहन यावेळी केले.

'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान अजय देवगन, अक्षय कुमारने केलं चाहत्यांना खास आवाहन

हेही वाचा -ट्रोल झाल्यानंतर यामी म्हणते, 'कोणाला दुखवण्याचा उद्देश नव्हता...'

अजय देवगण म्हणाला, की 'बऱ्याचदा सोशल मीडियावर अक्षय कुमारचे चाहते आणि माझ्या चाहत्यांमध्ये तगडी स्पर्धा दिसून येते. मात्र, आम्ही वैयक्तिक आयुष्यात फार चांगले मित्र आहोत. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आम्ही एकमेकांना नेहमी मदत करत असतो. आमच्यात कोणतीही स्पर्धा नाही'. तसेच अक्षयनेही यावेळी चाहत्यांनी एकमेकांशी न भांडता प्रेमाने राहावे, असे आवाहन केले.

'सूर्यवंशी' हा चित्रपट हा रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामातील चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट २४ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -काजोलची ह्रदयस्पर्शी 'देवी' शॉर्ट फिल्म झाली रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details