मुंबई - बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चन काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातील ओरछा येथे गेली होती. तिथे तिने मणिरत्नमच्या ‘पोन्नीयन सेल्वान’ या चित्रपटाचे चित्रीकरण केले. या सेटवरील तिचा एक फोटो प्रसिध्द झाला असून यात ती एका महाराणीच्या आवतारात दिसून येतेय. या खानदानी लूकमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीप्रमाणे खूपच खुलून दिसली आहे. ऐश्वर्याचा नव्या चित्रपटातला हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
ऐश्वर्याने या फोटोत लाल आणि सोनेरी रंगाची सिल्क साडी परिधान केली आहे. यार तिने घातलेले दागिनेही तिचे सौंदर्य वाढवणारे आहेत. या लूकमध्ये ती एखादी महाराणी वाटत आहे. तिच्या हातात पंखा दिसत असून याने ती स्वतःला हवा घालत आहे.
ऐश्वर्याच्या या फोटोत तिच्या बाजूला चित्रपटाची संपूर्ण टीम दिसून येतेय आणि तिच्या बाजूला एक मोठा बूम ठेवलेला दिसतोय. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय या चित्रपटात नंदिनी आणि तिची आई मंदाकिनी अशी दुहेरी भूमिका केली आहे.
तमिळ भाषेतील ऐतिहासिक नाट्य असलेल्या मनीरत्नमच्या चित्रपटासाठी ऐश्वर्या मध्य प्रदेशच्या ओरछा येथे गेली होती. असे म्हटले जाते की ऐश्वर्या या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. सुमारे दशकानंतर ती पुन्हा एकदा मनीरत्नम यांच्यासोबत ती काम करीत आहे. ऐश्वर्याने 1997 मध्ये मणीच्या 'इरुवर' या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्यासोबत ऐश्वर्याने गुरु आणि रावण सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दरम्यान, ‘पोन्नीयन सेल्वान’ या चित्रपटाचा पहिला भाग 2022 मध्ये रिलीज होणार आहे. ऐश्वर्यासह या चित्रपटात बाजूला विक्रम, कार्ती, त्रिशा कृष्णन, प्रकाश राज, जयराम, जयम रवी आणि ऐश्वर्या लक्ष्मी सारख्या कलाकारांचा समावेश आहे.
हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या 1955 च्या पोन्नीयन सेल्वन या कादंबरीवर आधारित आहे. या पुस्तकात दक्षिणेतील सर्वात शक्तिशाली राजांपैकी एक अरुलमोझीवर्मनच्या सुरुवातीच्या दिवसांची कहाणी आहे, जो पुढे महान चोल सम्राट राजा चोल म्हणून ओळखला गेला. पोन्नीयिन सेल्वन या चित्रपटाची निर्मिती रत्नमच्या प्रॉडक्शन हाऊस मद्रास टॉकीज, अलीराजा सुबास्करन, लाइका प्रोडक्शन्स बॅनर यांच्यावतीने केली जात आहे.
हेही वाचा - कंगणा रणौत स्टारर थलाईवी चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज