मुंबई -अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चननंतर आता ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर बच्चन कुटुंबातील इतरांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
शनिवारी अमिताभ यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबीयांनी खासगी लॅबमध्ये रॅपिज अँटीजेन कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये ऐश्वर्या आणि आराध्या यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, अमिताभ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निश्चित झाल्यामुळे, प्रोटोकॉलनुसार मुंबई महापालिकेने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी केली. त्यामध्ये या दोघींचाही अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.