मुंबई- दर वर्षी 13 हा दिवस जागतिक अवयव दान दिवस(World Organ Donation Day 2021) म्हणून साजरा केला जातो. अवयव दानाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. अवयव दानाची हे महान दानाच्या श्रेणीत गणना केली जाते. अंगदानाच्या या श्रृंखलेमध्ये बॉलिवूडचे काही स्टार्स सहभागी आहेत. कोरोना प्रभावामुळे ही संख्या थोडी कमी झाली आहे, परंतु आपण चर्चा करणार आहोत ज्यांनी आपल्या अवयव दानाची घोषणा केली आहे त्यांच्याबद्दल. यात एक अभिनेता असा आहे ज्याने आपल्या शरीराचे बहुतेक सर्व अवयव दान करण्याचा निर्णय केलाय.
सलमान खान
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने शरीरातील बोन मॅरो (Bone Marrow) अवयव दान करायचे ठरवले आहे. अवयव दान हे महान दान असल्याचे सांगत आपल्या चाहत्यांना सलमानने उत्साहित केले आहे.
प्रियंका चोप्रा
बॉलिवूडची देसी गर्ल आता आंतरराष्ट्रीय व्यक्तीमत्व बनली आहे. अवयव दानाच्या बाबतीत प्रियंका मागे नाही. प्रियंकाने आपल्या शरीरातील अवयव दानाची घोषणा केली आहे ज्यात किडनीचाही समावेश आहे.
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक या बाबतीत मागे कसे राहतील. बिग बी यांनीही अवयव दानाची घोषणा केली आहे. त्यांनी आपले डोळे दान करण्याची घोषणा केली आहे.