मुंबई - बहुचर्चित 'कलंक' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता अशात चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे. 'सैया मेरा अैरा गैरा' असं या गाण्याचं शीर्षक आहे.
आज पुरा इंडिया नाचेगा! 'कलंक'मधील 'अैरा गैरा' गाणं प्रदर्शित - aditya roy kapoor
या गाण्यात क्रिती सेनॉनच्या जबरदस्त डान्सची झलक पाहायला मिळत आहेत. तर वरूण आणि आदित्यही तिच्यासोबत ठुमके लगावताना दिसत आहेत
या गाण्यात क्रिती सेनॉनच्या जबरदस्त डान्सची झलक पाहायला मिळत आहेत. तर वरूण आणि आदित्यही तिच्यासोबत ठुमके लगावताना दिसत आहेत. वरूणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याची लिंक शेअर केली आहे. यासोबत आज पुरा इंडिया नाचेगा, असं कॅप्शनही दिलं आहे.
अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. याआधी प्रदर्शित झालेल्या 'कलंक'मधील घर मोरे परदेसीया गाण्यात आलियाचे कथक नृत्य पाहायला मिळाले होते. 'फर्स्ट क्लास' गाण्यात वरूणचे जबरदस्त ठुमके तर 'तबाह हो गए'मधील माधुरीच्या अदांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता हे गाणं प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी ठरतं का? ते पाहू.