मुंबई- बहुचर्चित 'कलंक' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशात चित्रपटातील नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. माधुरीच्या 'तबाह हो गए' या गाण्यानंतर आता आणखी एक जबरदस्त डान्स असलेलं चित्रपटातील गाणं आज प्रदर्शित होणार आहे.
'अैरा गैरा'! वरूण-आदित्यसोबत ठुमके लगावणार क्रिती, आज प्रदर्शित होणार गाणं - kriti sanon
या गाण्यात प्रेक्षकांना क्रिती सेनॉनचा डान्स पाहायला मिळणार असून क्रिती यात आदित्य रॉय कपूर आणि वरूणसोबत ठुमके लगावताना दिसणार आहे
या गाण्यात प्रेक्षकांना क्रिती सेनॉनचा डान्स पाहायला मिळणार असून क्रिती यात आदित्य रॉय कपूर आणि वरूणसोबत ठुमके लगावताना दिसणार आहे. 'सैया मेरा अैरा गैरा' असं या गाण्याचं शीर्षक आहे. क्रितीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून गाण्याचा टीझर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
हे गाणं माझ्यासाठी खूप स्पेशल असून ते प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आता अजून प्रतीक्षा करू शकत नाही, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान १७ एप्रिलला 'कलंक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात वरूण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.