मुंबई- बॉलिवूडमधील आघाडीचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अशात आता लवकरच त्यांचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मलाल' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला.
'आयला रे'! 'मलाल'मधील मराठमोळा तडका असलेलं नवं गाणं प्रदर्शित - sharmin shegal
'आयला रे' असं नाव असलेल्या या गाण्यालाही मराठमोळा टच आहे. या गाण्यातील काही ओळी मराठीमध्ये आहेत. विशाल ददलानी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.
या ट्रेलरमधून चित्रपटाला मराठी टच असल्याचं लक्षात आलं. यानंतर आता चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'आयला रे' असं नाव असलेल्या या गाण्यालाही मराठमोळा टच आहे. या गाण्यातील काही ओळी मराठीमध्ये आहेत. विशाल ददलानी यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.
गाण्याला संजय लिला भन्साळी यांनी संगीत दिलं आहे तर प्रशांत इंगोले यांनी हे गाणं लिहिलं आहे. या चित्रपटाची शिवा आणि आस्था या जो़डीभोवती फिरणारी आहे, जे एकदम वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आले आहेत. अशात त्यांचं प्रेम यशस्वी होतं, की दोघांनाही वेगवेगळे मार्ग निवडावे लागतात, याची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटातून शर्मिन शेगल आणि मिझान जाफरी हे कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.