मुंबई - महत्त्वाकांक्षी अभिनेत्री शनाया कपूरने तिच्या पदार्पणाच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच एक नवीन कार खरेदी केली आहे. अभिनेता संजय कपूर आणि डिझायनर महीप कपूर यांची मुलगी शनाया, आता ऑडी Q7 ची मालकीण बनली आहे. या कारची किंमत 80 लाख रुपये आहे. स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाणारी ही स्टारकिड करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे.
करण जोहर याची निर्मिती असलेल्या 'बेधडक' चित्रपटातून शनाया बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. चित्रपट अद्याप फ्लेअरवर शुटिंगसाठी जाणे बाकी आहे पण त्याआधी शनायाने एक नवीन लक्झरी कार घरी खरेदी केली आहे. ऑडी मुंबई वेस्टच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये शनायाने रविवारी कार खरेदी केली असल्याचे दिसते. आपल्या नव्या कारसोबत शनाया उभी असल्याचे पोटोत दिसते. या खरेदीच्यावेळी तिचे आई वडीलही तिच्यासोबत उपस्थितीत होते.