महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आणखी एक स्टार पुत्र बॉलिवूड पदार्पणास सज्ज, बहिणीच्या डेब्यूनंतर आजमावतोय नशिब - आरएक्स १००

अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःला आजमावणार आहे. 'आरएक्स १००' ( RX100 ) या तेलुगु चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो झळकणार आहे. याचे आजपासून दक्षिण मुंबईतील थिएटरमध्ये शूटींग सुरू होईल.

अहान शेट्टी

By

Published : Aug 6, 2019, 10:56 AM IST


मुंबई - अनेक स्टार किड्सनी आपले नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांना यात यशही मिळालंय तर काही जण पदार्पणानंतर गायब झालेत. अलिकडे 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून सनी देओलचा मुलगा करण देओल पदार्पण करणार आहे. तोपर्यंत आणखी एका स्टार किड्सच्या पदार्पणाची बातमी येत आहे. या नव्या स्टारचे नाव आहे अहान शेट्टी.

अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःला आजमावणार आहे. 'आरएक्स १००' ( RX100 ) या तेलुगु चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो झळकणार आहे. याचे आजपासून दक्षिण मुंबईतील थिएटरमध्ये शूटींग सुरू होईल. यामध्ये तारा सुतारिया ही त्याची सहकलाकार असेल. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. मिलन लुथारिया याचे दिग्दर्शक आहेत.

सुनिल शेट्टी यांची मुलगी आथिया शेट्टी हिने 'हिरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली या चित्रपटाचा नायक होता. सलमान खानची निर्मिती असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नव्हता.

RX100 हा तेलुगु चित्रपटा अलिकडेच तेलुगुमध्ये तुफान चालला होता. ही एक निरागस प्रेमकथा आहे. मात्र सुडाने पेटलेल्या तरुणाची साहसी कथाही आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांना यश मिळते हे आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच या कथानकाची निवड अहान शेट्टीने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details