महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तडप' प्रदर्शित होण्यापूर्वीच अहान शेट्टीने मिळवला अक्षय कुमारसोबत चित्रपट - सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी

सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याचा पहिला 'तडप' हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण न केलेल्या या अभिनेत्याच्या हातामध्ये सध्या आणखी दोन चित्रपट आहेत.

Ahan Shetty, son of Sunil Shetty
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी

By

Published : Jun 28, 2021, 10:01 PM IST

मुंबई - ९०च्या दशकातील अ‍ॅक्शन स्टार सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आगामी 'तडप' या चित्रपटात अभिनेत्री तारा सुतारियासोबत चित्रपट करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. 'तडप' चित्रपटा प्रदर्शनसाठी सज्ज असून अहानच्या हातामध्ये आणखी दोन चित्रपट आहेत.

२०२० मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या काही महत्त्वाकांक्षी स्टार किड्समध्ये अहानचा समावेश आहे. 'तडप' या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये सजीद नाडियादवाला यांचेही एक नाव आहे. 'तडप' हा मिलान लुथरिया दिग्दर्शित २०१९चा तेलुगु हिट 'आरएक्स 100' चित्रपटाचा हिंदी रीमेक आहे.

गेल्या आठवड्यात नाडियादवाला ग्रँडसन एन्टरटेन्मेंटने अक्षय कुमार आणि अहान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या आणखी एका चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट सध्या नियोजनाच्या टप्प्यावर असून तपशील अद्यापही गुलदस्त्यात आहे.

मिळालेल्या ताज्या बातमीनुसार अहान शेट्टीने एका आठवड्यात आणखी एक चित्रपट मिळवला आहे. महेश भट्ट यांच्या आशिकी ३ मध्ये तो भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग पुढील वर्षी सुरू होईल.

हेही वाचा - 'रश्मिका'साठी फॅनची 900 किमी वारी: भेटी लागे जीवा 'मंदाना'ची आस, 'रश्मिका'साठी कायपण..!!

ABOUT THE AUTHOR

...view details