मुंबई- 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत असल्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचे तारेही चमकले आहेत. काश्मीर फाइल्सने बॉक्स ऑफिसवर आजवर २११ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट मुस्लीमविरोधी असून समाजात फूट पाडण्याचे काम करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण वाद आणि विवेक अग्निहोत्रीचे नाते खूप जुने आहे. याआधी 'ताश्कंद फाईल्स'वरूनही बराच गदारोळ झाला होता. आता विवेक लवकरच दिल्ली दंगलीवर चित्रपट बनवणार आहे.
मीडियाशी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की आम्ही सध्या 'द दिल्ली फाइल्स' हा चित्रपट बनवत आहोत. दिल्लीत झालेल्या दंगलीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. तसेच वेब सिरीज बाबत बोलताना अग्निहोत्रींनी सांगितले होते की काश्मीर फाईल्स बनवताना त्यांनी केलेले संशोधन सामुग्री इतकी आहे की त्यावर वेब सिरीज बनू शकते. यासाठी काही चांगल्या माणसांची गरज आहे जी हे सर्व एकत्र बांधू शकतील. हे खूप मनोरंजक असेल परंतु कोणीतरी यासाठी वित्तपुरवठा करावा लागेल. हा आपला इतिहास आणि वारसा आहे आणि कोणत्याही मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने तो उचलला पाहिजे.