मुंबई (महाराष्ट्र): चित्रपट निर्माते रोहित शेट्टी (Filmmaker Rohit Shetty )म्हणाला की त्याला त्याच्या आगामी कॉमेडी चित्रपट सर्कस (Cirkus) च्या रिलीजची तारीख जाहीर करण्याची घाई नाही. कारण त्याला फिल्म उद्योगातील अगोदरचा अनुशेष दूर करायचा आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृहे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर, अक्षय कुमारची (Akshay Kumar) मुख्या भूमिका असलेला रोहित शेट्टीचा अॅक्शन-ड्रामा 'सूर्यवंशी' (Shetty's action-drama Sooryavanshi) हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा हिंदी चित्रपट होता.
कोरोनाव्हायरस साथीमुळे 5 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी 19 महिन्यांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागलेल्या सूर्यवंशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांच्या सोलो रनचा आनंद लुटला. या काळात कोणताही हिंदी चित्रपट रिलीज झाला नाही. 'सुर्यवंशी'ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 180 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
रोहित शेट्टी म्हणाला की रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या सर्कसला रिलीज होण्यासाठी योग्य विंडोची प्रतीक्षा करावी लागेल. कोरोनामुळे गेली दिड वर्षे मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेले नाही. अनेक चित्रपटांना प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये चित्रपटांचा मोठा बॅकलॉग बाकी आहे.
याविषयी बोलताना रोहित म्हणाला, "फिल्म इंडस्ट्रीमध्ये इतका बॅकलॉग बाकी आहे की मला त्यात उडी मारायची नव्हती. शिवाय, मी सूर्यवंशी घेऊन आलो तेव्हा दोन आठवडे कोणीही निर्मात्याने न येता सहकार्य केले. लोक माझ्याशी भांडू शकत होते किंवा पुढच्या आठवड्यात येऊ शकले असते. पण त्यांनी मला सहकार्य केले. कारण मी इतका वेळ माझ्या चित्रपटासाठी प्रतीक्षा करीत होतो."