मुंबई- "कभी कभी लगता है अपुन ही भगवान है", गणेश गायतोंडेचा हा डायलॉग सर्रास अनेकांच्या तोंडी दैनंदिन जीवनात ऐकायला मिळतो. 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमधील गणेश गायतोंडे म्हणजेच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या रोलला मिळालेल्या प्रेक्षकांच्या पसंतीनंतर नवाज आता नेटफ्लिक्सच्या आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.
‘सेक्रेड गेम्स'नंतर नेटफ्लिक्सच्या चित्रपटात नवाजची वर्णी, या पुस्तकावर असणार आधारित - webseries
हा चित्रपट मनु जोसेफ यांच्या एका पुस्तकावर आधारित असणार आहे. या चित्रपटाची कथा दलित समाजातील एक मुलगा आणि त्याच्या वडिलांमधील नात्यावर आधारित असणार आहे.

‘सिरीयस मॅन’ असं या चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट मनु जोसेफ यांच्या एका पुस्तकावर आधारित असणार आहे. या चित्रपटाची कथा दलित समाजातील एक मुलगा आणि त्याच्या वडिलांमधील नात्यावर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधिर मिश्रा करणार आहेत.
सेक्रेड गेम्सनंतर सिरीयस मॅनच्या निमित्ताने पुन्हा एकदा नेटफ्लिक्ससोबत काम करण्याची संधी मिळाल्याने आनंदी असल्याचं नवाजनं म्हटलं आहे. तर 'सेक्रेड गेम्स'प्रमाणेच या चित्रपटातील आपल्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी आशा नवाजने व्यक्त केली आहे.