मुंबई- कंगना रणौतला मुंबईत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले होते. त्यानंतर कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेत तिने मुंबईची तुलना तालिबानशी केली आहे.
''बरेच लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देत आहेत. म्हणून मी आता येत्या आठवड्यात मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा मी वेळ पोस्ट करते. किसी के बाप में हिम्मत है तो रोक ले.''असे ट्विट कंगनाने केले होते.