हैदराबाद- दाक्षिणात्य चित्रपटातून नाव लौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आता बॉलिवूडच्या दरवाजावर उभी आहे. बॉलिवूड पदार्पणासाठी ती आता सज्ज झाली आहे.
सोमवारी रश्मिकाने तिच्या फॉलोअर्ससमवेत इन्स्टाग्राम लाइव्ह सेशन केले. यावेळी तिने चाहत्यांना सांगितले की तिने बॉलिवूड चित्रपट साईन करणार आहे. तिचा पदार्पणाचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिने बॉलिवूडचा आणखी एक चित्रपट साईन केला आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्पाय थ्रिलर 'मिशन मजनू' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि तिचा दुसरा हिंदी चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'अलविदा' हा आहे.