मुंबई- कबीर सिंग या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. यातील शाहिद आणि कियारा अडवाणी यांच्या अभिनयाला आणि कबीर प्रीतीच्या प्रेमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. यानंतर आता हिच जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. मात्र, यावेळी चित्रपटासाठी नव्हे तर एक प्रेमकथा सांगण्यासाठी.
नवी प्रेमकथा घेऊन कबीर अन् प्रीती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला - काल्पनिक प्रेमकथा
इश्क डबल शॉटच्या एपिसोडमधून काही काल्पनिक प्रेमकथा हे कलाकार सांगताना दिसणार आहेत. प्रसिद्ध झालेल्या एका एपिसोडमध्ये ते रुह आणि अंश यांची काल्पनिक कथा सांगत आहेत
इश्क डबल शॉटच्या एपिसोडमधून काही काल्पनिक प्रेमकथा हे कलाकार सांगताना दिसणार आहेत. प्रसिद्ध झालेल्या एका एपिसोडमध्ये ते रुह आणि अंश यांची काल्पनिक कथा सांगत आहेत. रुह आणि अंश दोघेही एका म्यूझिक अल्बमसाठी एकत्र येतात आणि पुढे अंश रुहच्या प्रेमात पडतो. मात्र, नंतर त्याला समजतं, की रुह विवाहित आहे. या संपूर्ण एपिसोडमध्ये शाहिद अंश तर कियारा रुहच्या पात्राचे सादरीकरण करताना दिसते.
कथेच्या शेवटी रुह कोणता निर्णय घेणार आणि या कथेचा शेवट काय असणार हे निवडण्याची संधी प्रेक्षकांनाच देण्यात आली आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाहिद आणि कियाराच्या जोडीला एकत्र पाहण्याची संधी मिळत असल्याने हा शो त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच खास असणार आहे.