मुंबई - अलिकडेच रिलीज झालेल्या 'हाउसफुल 4' चित्रपटामध्ये कृती सेनन आणि अक्षय कुमार यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. दोघांची केमिस्ट्रीही लोकांना आवडली. त्यांच्या चाहत्यांसाठी आता गुड न्यूज आहे. ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
कन्फर्म! 'हाउसफुल 4' नंतर 'बच्चन पांडे' मध्ये अक्षयसोबत झळकणार कृती सेनन - Akshay kumar and Kriti Senon
अभिनेत्री कृती सेनन हिला अक्षय कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे'साठी निवडण्यात आलंय. येत्या फेब्रुवारीत शूटींग सुरू होईल. २०२० च्या ख्रिसमसला सिनेमा रिलीज होईल.
अक्षय कुनार आणि कृति सेनन
खिलाडी कुमारच्या आगामी 'बच्चन पांडे' चित्रपटासाठी कृतीला निवडण्यात आले आहे. यामुळे 'हाउसफुल 4'चीही हिट जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळेल.
कृतीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये या बातमीला दुजोरा देताना स्क्रिनशॉट शेअर केला आहे. 'बच्चन पांडे'च्या शूटींगला येत्या फेब्रुवारीत सुरू होईल. २०२० च्या ख्रिसमसला सिनेमा रिलीज होईल.