महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 19, 2022, 12:08 PM IST

ETV Bharat / sitara

Dhanush Aishwaryaa split : RGV म्हणतो 'हुशार लोक प्रेम करतात आणि ढ लग्न'

अभिनेता धनुष आणि दिग्दर्शिका ऐश्वर्या धनुष यांनी वेगळे ( Dhanush Aishwaryaa split )होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्माने ( RGV ) ट्विटरवर प्रेम आणि लग्नावर अनेक ट्विट केले आहेत.

धनुष ऐश्वर्या घटस्पोट
धनुष ऐश्वर्या घटस्पोट

मुंबई (महाराष्ट्र)- लग्नापेक्षा जास्त वेगाने प्रेमाची हत्या होत नाही, असे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ( Ram Gopal Varma ) यांनी म्हटलंय. धनुष-ऐश्वर्या विभक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने सोशल मीडियावर ट्विट केले आहे. राम गोपाल वर्माने सोशल मीडियावर लिहिले की, जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत प्रेम करत राहणे आणि नंतर ''लग्न'' नावाच्या तुरुंगात जाणे हेच आनंदाचे रहस्य आहे."

राम गोपाल वर्माने ट्विटरवर लग्न आणि प्रेम याबद्दल अनेक ट्विट केले आहेत. त्याने लिहिलंय, "स्टार घटस्फोट हा तरुणांना लग्नाच्या धोक्यांबद्दल सावध करण्यासाठी एक चांगला ट्रेंडसेटर आहे. लग्नापेक्षा प्रेमाची हत्या जास्त वेगाने होत नाही. आनंदाचे रहस्य हे आहे की जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत प्रेम करत राहणे आणि नंतर तुरुंगात जाण्याऐवजी लग्नात पुढे जाणे.''

"लग्नातील प्रेम ते साजरा केलेल्या दिवसांपेक्षा कमी दिवस टिकते, जे 3 ते 5 दिवस असते. हुशार लोक प्रेम करतात आणि ढ लग्न करतात.

मुक्ती मिळाल्याने घटस्फोट संगीताने साजरे केले पाहिजेत कारण एकमेकांच्या धोक्याच्या गुणांची चाचणी विवाहात शांतपणे होत असते. लग्न ही एक वाईट प्रथा आहे जी आपल्या ओंगळ पूर्वजांनी समाजावर सतत दुःख आणि दुःखाचे चक्र चालू ठेवण्यासाठी लादलेली आहे."

विशेष म्हणजे राम गोपाल वर्माचीची निरीक्षणे अभिनेता धनुष आणि दिग्दर्शक ऐश्वर्या धनुषने वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासातच आली आहेत.

हेही वाचा -अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित 'बच्चन पांडे'ची रिलीज तारीख ठरली

ABOUT THE AUTHOR

...view details