महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ब्रेकअपनंतर पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत रोहमन शॉल - रोहमन शॉल सुष्मिता सेन

रोहमन शॉल वरवर पाहता ब्रेकअपच्या समस्यांशी सामना करत आहे. तो थोडा अंतर्मुख झाला आहे. पुन्हा एकदा यातून उभारी घेणार असल्याचे नवीन पोस्टमधून त्याने लिहिले आहे.

रोहमन शॉल सुष्मिता सेन
रोहमन शॉल सुष्मिता सेन

By

Published : Jan 24, 2022, 1:27 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा मॉडेल बॉयफ्रेंड रोहमन शॉल हे जोडपे यांच्या रिलेशनमध्ये अंतर आल्याने ते विभक्त झाले आहेत. रोहमन ब्रेकअप झाल्यापासून थोडा अंतर्मुख झाला आहे. पुन्हा एकदा यातून उभारी घेणार असल्याचे त्याच्या नवीन पोस्टमधून त्याने लिहिले आहे.

रविवारी रोहमनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक सुंदर व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो मावळत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर टेरेसवर बसलेला दिसत आहे. आकाशाकडे पाहताना, रोहमन विचारांमध्ये हरवलेला दिसतो आहे आणि कॅमेराकडे एक नजर देतो आहे.

सकारात्मक विचार शेअर करत रोहमनने लिहिले, "मावळत्या सूर्याने मला जाणीव करून दिली की, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अगदी खालच्या टप्प्यावर असाल, तर सुंदरता खाली उतरण्याची खात्री करा की ते पाहणाऱ्यांना उठण्याची गरज वाटेल."

सुष्मिता आणि रोहमन विभक्त झाल्याच्या अफवा अनेक दिवसांपासून पसरत होत्या. सुष्मिता आणि रोहमन यांनी त्यांचे मौन तोडले आणि डिसेंबरमध्ये विभक्त होण्याची घोषणा केली तेव्हा ही अटकळ खरी ठरली होती.

अभिनेत्री सुष्मिता आणि रोहमनच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांचे मन दु:खी झाले होते. यावर अनेकांनी सोशल मीडियावर आपली मते मांडली. काहींनी रोहमनला सुष्मिताचे किती देणे लागतो हे विसरू नये असा सल्लाही दिला होता.

या विशिष्ट टिप्पणीने रोहमनचे लक्ष वेधून घेतले होते आणि त्याने त्वरित प्रतिक्रिया देत लिहिले होते,"मी ते कधीच विसरू शकत नाही!! ती माझे कुटुंब आहे (रेड हार्ट इमोजी)," असे त्याने उत्तर दिले होते.

लव्हबर्ड्स वेगळे झाले आहेत पण मैत्री कायम राहील असे सांगितले आहे. 2018 मध्ये इंस्टाग्राम डीएमवर कनेक्ट झाल्यानंतर सुष्मिता आणि रोहमनने डेटिंगला सुरुवात केली होती.

हेही वाचा -'वामिका'चा चेहरा दिसल्याने विरुष्काचा फॅन्समध्ये विभाजन

ABOUT THE AUTHOR

...view details