मुंबई- आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित 'सुपर ३०' चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. या सिनेमात हृतिक रोशनने आनंद कुमारांची भूमिका साकारली आहे. एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द असेल, तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवू शकत नाही, असा संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अशात आता हा सिनेमा उत्तर प्रदेशात करमुक्त करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातही 'सुपर ३०' करमुक्त; हृतिक रोशनने मानले मुख्यमंत्री योगींचे आभार - yogi adityanath
आनंद कुमारांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी हा सिनेमा करमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांची हीच मागणी पूर्ण करत हा सिनेमा करमुक्त केला गेला.
सामान्य विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत त्यांची असामान्य स्वप्न पूर्ण करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या आनंद कुमारांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा चित्रपट बिहार आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला होता. ज्यानंतर आता उत्तर प्रदेशातही हा सिनेमा करमुक्त करण्यात आला.
आनंद कुमारांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी हा सिनेमा करमुक्त करण्याची विनंती केली होती. त्यांची हीच मागणी पूर्ण करत हा सिनेमा करमुक्त केला गेला. याबद्दलची माहिती देत हृतिकने योगी आदित्यनाथ यांचे आभार मानत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसलर ८०.३६ कोटींची कमाई केली आहे.