मुंबई : सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर तीन फेडरल एजन्सीज एनसीबी, ईडी आणि सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) यांच्यामार्फत चौकशी झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती नव्या वर्षात पुन्हा चित्रपटात कमबॅक करणार आहे.
सुशांत आणि रियाची निकटची मैत्री असलेले चित्रपट निर्माते रुमी जाफरे म्हणाले की या वर्षाच्या सुरुवातीस रिया चक्रवर्ती शुटिंग सेटवर अवतरेल.
एका वेबलॉईडशी बोलताना रूमी रिया चक्रवर्ती पुन्हा कामाला सुरूवात करणार असल्याचे सांगितले. "रियासाठी हे वर्ष अत्यंत क्लेशकारक ठरले आहे. अर्थात हे वर्ष सर्वांसाठीच वाईट होते. परंतु तिच्या बाबतीत हा एक आघात होता. एखाद्या मध्यमवर्गीय मुलीवर एक महिना तुरुंगात घालवण्याचा प्रसंग ओढवता याची तुम्ही कल्पना करु शकता का? यामुळे तिचे मनोबल खचले आहे.'', असे रुमी जाफरे पुढे म्हणाले.
रुमी नुकतेच रियाला भेटले तेव्हा ती खचलेली आणि शांत दिसली. चित्रपट निर्माते रमी जाफरे यांनी सांगितले की त्यांनी रियालाही आश्वासन दिले की तिला काहीही झाले तरी इंडस्ट्रीकडून स्वीकारले जाईल.