महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच हलणार पाळणा - अभिनेत्री श्वेता अग्रवाल

गायक आदित्य नारायण आणि अभिनेत्री श्वेता अग्रवाल यांनी चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. दोघेही आई वडील होणार असल्याची ही गुड न्यूज त्यांनी इन्स्टाग्रामवर दिली आहे.

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल

By

Published : Jan 24, 2022, 6:36 PM IST

मुंबई (महाराष्ट्र)- गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. दोघेही कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. सोमवारी आदित्यने इंस्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्ससोबत ही गोड बातमी शेअर केली.

त्याने दोघांचा आनंदी फोटो शेअर केला ज्यामध्ये श्वेताचा बेबी बंप दिसत आहे. "आम्ही आमच्या पहिल्या मुलाचे लवकरच स्वागत करत आहोत हे सांगताना श्वेता आणि मी कृतज्ञ आणि धन्य आहोत.," असे आदित्यने पोस्टला कॅप्शन दिले.

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल

चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. "व्वा..किती सुंदर आहे. तुम्हा दोघांचे अभिनंदन," अशी प्रतिक्रिया गायिका नेहा कक्करने दिली आहे. "हार्दिक अभिनंदन. किती छान बातमी आहे,"असे गायिका श्रेया घोषालने लिहिले आहे.

डिसेंबर 2020 मध्ये एका इंटिमेट सोहळ्यात दोघांनी लग्न केले. गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य याने दिल बेचारा आणि राम लीला यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी गाणे गायले आहे, तर श्वेताने विक्रम भट्टचा हॉरर चित्रपट शापित आणि अभिनेता सुदीपची भूमिका अलेलेल्या कन्नड चित्रपट 'किच्चा' मध्ये काम केले आहे.

हेही वाचा -Video : बर्फवृष्टीत 'जेसीबी'वरुन निघाली 'अजब वरात' !! पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details