महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ड्रग प्रकरणात विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाला अटक - विवेक ओबेरॉयच्या घरीही पडला होता छापा

आदित्य अल्वा याच्यावर बंगळुरूमधील त्याच्या 'हाऊस ऑफ लाइफ' या ठिकाणी ड्रग्स सेवन केले जात होते असा आरोप होता. त्यानंतर तो फरार झाला होता. त्याला सोमवारी सँडलवुड ड्रग प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बेंगळुरू पोलिस गुन्हे शाखेने चेन्नई येथून अटक केली.

Aditya Alva,
आदित्य अल्वा

By

Published : Jan 12, 2021, 3:23 PM IST

बंगळुरू- कर्नाटकचे माजी मंत्री जीवनराज अल्वा यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आदित्य अल्वा याला सोमवारी सँडलवुड ड्रग प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बेंगळुरू पोलिस गुन्हे शाखेने चेन्नई येथून अटक केली. सप्टेंबर २०२० मध्ये सँडलवूड ड्रग्स प्रकरणात त्याचे नाव आले असल्याने आदित्य अल्वा फरार होता. यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयात दाखल केलेला एफआयआरही रद्द करावा लागला.

वैद्यकिय तपासणीनंतर कोर्टात करणार हजर

मंगळवारी आदित्य अल्वा याला वैद्यकीय तपासणीसाठी बेंगळूरु येथे नेण्यात आले. त्याला न्यायालयात नेले जाईल, त्यानंतर पोलिस त्याला ताब्यात घेण्याची मागणी करतील. सुरुवातीच्या चौकशीत आदित्य अल्वा याने स्वत: निर्दोष असल्याचे सांगितले होते. आदित्यने सांगितले की त्याने फक्त पार्टीचे आयोजन केले होते, परंतु मादक पदार्थ सेवन करणाऱ्या कोणालाही तो ओळखत नाही. आत्तापर्यंत ड्रगविषयीची कोणतीही शंकास्पद माहिती आदित्यच्या चौकशीत सापडली नाही. पोलिस कोठडीत असताना त्याच्याशी प्रश्नोत्तर कायम राहतील.

ड्रग प्रकरणानंतर फरार होता आदित्य अल्वा

अशी माहिती आहे की आदित्य अल्वा याच्यावर आरोप आहे की, बेंगळुरूमधील त्याच्या 'हाऊस ऑफ लाइफ' या ठिकाणी ड्रग्स सेवन केले जात होते. पोलिसांच्या एका सूत्राने सांगितले- अल्वा चेन्नईत त्या घरात ड्रग्स प्रकरणात नाव आल्यानंतर राहत होता. पण तो पुन्हा पुन्हा चेन्नईच्या बाहेर जात होता. तो कोठे जात होता हे आम्हाला ठाऊक नव्हते. त्याच्या चेन्नईला परत जाण्याची सूचना आम्हाला मिळाली आणि आम्ही ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली आणि त्याला पकडले.

चेन्नईमध्ये साथीदारांसह होता भूमिगत

आदित्य अल्वा हा आपल्या इतर दोन साथीदारांसह चेन्नईमध्ये होता. दोन्ही साथीदार त्याला घरातील कामात मदत करत असत. अहवालानुसार आदित्य अल्वा ज्या घरात चेन्नईमध्ये राहत होता, तेथून तो अद्याप बाहेर पडलेला नव्हता आणि तो तेथेच भूमिगत होता.

फरार अल्वाच्या शोधात होते पोलीस

विवेक ओबेरॉयचा मेहुणेाआदित्य अल्वा याचे नावही काही काळापूर्वी चंदन ड्रग प्रकरणात समोर आले होते. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता आदित्य त्याच्या घरातून पळून गेला होता. पोलिसांनी सांगितले होते की- 'आदित्य अल्वा फरार आहे. विवेक ओबरॉय हे त्याचे नातेवाईक आहेत आणि आम्हाला कळले की आदित्य घरात लपला आहे. म्हणून आम्हाला तपासायचे होते. यासाठी कोर्टाकडून वॉरंट घेण्यात आले आणि आमची गुन्हे शाखेची टीम बेंगळुरुहून मुंबईत त्याच्या घरी गेली. त्यानंतर पोलिस आदित्यच्या शोधात गुंतले होते.

विवेक ओबेरॉयच्या घरीही पडला होता छापा

अलीकडेच, सँडलवुड ड्रग्स प्रकरणात विवेक ओबेरॉय याची पत्नी प्रियंका अल्वा ओबेरॉय यांचे भाऊ आदित्य अल्वांशी असलेल्या संबंधाबद्दल शहर क्राईम ब्रँचने नोटीस दिली होती. बेंगळुरू पोलिसांनीही विवेक ओबेरॉय यांच्या घरी छापा टाकला होता. बेंगळुरू पोलीस सर्च वॉरंटसह जुहू येथील विवेक ओबेरॉयच्या घरी पोहोचले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details