मुंबई- भारताच्या इतिहासामध्ये २५ जून १९८३ ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली ती लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकल्याने. याच विजयावर आधारित ‘८३ द फिल्म’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटातील आणखी एका कलाकाराची भूमिका समोर आली आहे.
'८३ द फिल्म': आदिनाथ कोठारे साकारणार दिलीप वेंगसरकरांची भूमिका - ranveer singh
भारताचे सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंगसरकर यांनी १९७६ ते १९९१ दरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत झळकणार आहे. भारताचे सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंगसरकर यांनी १९७६ ते १९९१ दरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. वेंगसरकर यांनी १९८३ मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.
त्यांच्या याच कामगिरीची झलक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील अनेक भूमिकांवरील पडदे उठण्यास सुरूवात झाली आहे. अशात क्रिकेटप्रेमी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.