भारतीय क्रिकेट संघाने १९८३ च्या विश्वचषकात बलाढ्य वेस्ट इंडिजला अंतिम सामन्यात हरवून इतिहास रचला होता. याच विषयावर आधारित 'एटीथ्री' हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करीत आहे. यात दिलीप वेंगसरकरची व्यक्तीरेखा मराठमोळा आदिनाथ कोठारे साकारत आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाहा, आदिनाथ कोठारे '83'मधील वेंगसरकर फर्स्ट लूक - 83
आदिनाथ कोठारेने '83'मधील आपला फर्स्ट लूक शेअर केला आहे...यात तो दिलीप वेंगसरकरची व्यक्तीरेखा साकारत आहे...८३ मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाची ही कथा आहे...
चित्रपटाची संपूर्ण टीम सध्ये धर्मशाला येथील क्रिकेट मैदानावर दिग्गजांकडून क्रिकेटचे धडे गिरवत आहे. स्वतः कपील देव यांनी या ठिकाणी भेट देऊन सर्वच कलाकारांचे मनोबल वाढवले होते. आदिनाथनेही कपील देवसोबतचा फोटो शेअर केला होता.
आदिनाथचा लूक हुबेहुब दिलीप वेंगसरकर यांच्यासारखा दिसत आहे. तो सध्या केवळ क्रिकेट खेळण्यावर भर देण्यासोबतच वेंगसरकर यांची देहबोली, बोलणे आणि दिसणे यावर भर देताना दिसतोय. धर्मशालाच्या मैदानात आदिनाथ रणवीर सिंगसह सहकारी कलाकारांसोबत एन्जॉय करीत आहे.