मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या अभिनयामुळे आणि डॅशिंग अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. अशात बॉलिवूडपाठोपाठ संजयनं आता मराठी चित्रपटसृष्टीतही एन्ट्री केली आहे. संजय दत्तच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनणारा पहिला मराठी सिनेमा बाबा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बाप-मुलाच्या नात्याची हळूवार कथा, संजय दत्तच्या 'बाबा'मधील अडगुलं मडगुलं गाणं प्रदर्शित - adgula madgula
गाण्यात बाप लेकाच्या नात्याची खास झलक पाहायला मिळत आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक लहान गोष्टीचा आनंद घेत जीवन जगणारी बाप लेकाची जोडी पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू उमटेल.
संजू बाबा या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याने हा सिनेमा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता सिनेमातील अडगुलं मडगुलं हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या गाण्यात बाप लेकाच्या नात्याची खास झलक पाहायला मिळत आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक लहान गोष्टीचा आनंद घेत जीवन जगणारी बाप लेकाची जोडी पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू उमटेल. या गाण्याला रोहन प्रधानने आवाज दिला आहे. दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केल असून चित्रपटात दिपक दोबरियाल, नंदिता पाटकर, आर्यन मेघजी, चित्ररंजन गिरी, स्पृहा जोशी आणि अभिजीत या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा येत्या २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.