महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शाहरुखच्या संडे नाईट पार्टीत बॉलिवूड स्टार्ससह अदर पूनावाला - नताशा पूनावाला

बॉलिवूड स्टार्स कामात व्यग्र असतानाही त्यांचे वीकएंड गेट-टुगेदर करतात. आता शाहरुख खान आणि गौरी खानच्या वीकेंड नाईट पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर आला आहे, ज्यात बॉलिवूडचे मोठे स्टार्स दिसत आहेत.

darPoonawala in Shah Rukh's party
शाहरुखच्या पार्टीत अदर पूनावाला

By

Published : Aug 9, 2021, 3:39 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार्सचे कामाचे शेड्यूल व्यग्र असूनही ते वीकेंडला पार्टीसाठी वेळ काढतात. आता शाहरुख खान आणि गौरी खानच्या वीकेंड नाईट पार्टीचा एक फोटो सोशल मी़डियावर झळकलाय. यात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार दिसून येत आहेत.

शाहरुख-गौरीच्या वीकेंड पार्टीत करीना कपूर खान, मलायका अरोरा, करण जोहर, मनीष मल्होत्रा, करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला पत्नी नताशा पूनावाला यांच्यासोबत पोहोचले होते.

शाहरुखच्या पार्टीत अदर पूनावाला

हा फोटो अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. करिश्मा व्यतिरिक्त, अमृता अरोरा आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी देखील त्यांच्याशी संबंधित इन्स्टाग्राम पेजवर हा फोटो शेअर केला आहे.

फोटो शेअर करत करिश्माने लिहिले, 'एक परफेक्ट रविवारची संध्याकाळ'.

त्याचवेळी अमृतानेही हा फोटो शेअर केला आणि लिहिले, ''रविवारी रात्री प्रियजनांसोबत.'' अनेक चाहत्यांनी करिश्माच्या पोस्टवर लिहिले की, बऱ्याच दिवसांनी शाहरुख आणि करीना एका फोटोमध्ये दिसले. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या करीना आणि शाहरुख अनेक वर्षांनंतर एका फोटो प्रेममध्ये एकत्र दिसले.

या फोटोत करीना कपूर, नताशा पूनावाला, अमृता अरोरा, करिश्मा कपूर आणि आदर पूनावाला सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. तर शाहरुख, गौरी, मनीष, मलायका आणि करण जोहर मागे उभे दिसतात.

हेही वाचा - जर बिग बॉसच्या घरात गेलो तर माझ्यासोबत हव्यात करीना आणि मलायका- करण जोहर

ABOUT THE AUTHOR

...view details