मुंबई - सोशल मीडियावर सध्या 'बोटल कॅप चॅलेंज'चा जोरदार ट्रेंड सुरू आहे. अनेक सेलेब्रिटी बाटलीचे बूच उडवण्यात मश्गुल आहेत. रोज सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आता जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो आहे प्रसिध्द गायक अदनान सामी याचा. त्याने हे चॅलेंज पियानोच्या सुरांनी पूर्ण केलंय.
अदनान सामीचा अनोखा "म्युझिकल" बोटल कॅप चॅलेंजचा व्हिडिओ व्हायरल - playing Piaano
पियानोच्या मधुर स्वरांसह अदनान सामीने बाटलीचे बूच उडवत अनोखे 'बोटल कॅप चॅलेंज' पूर्ण केले आहे. त्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.
"म्युझिकल" बोटल कॅप चॅलेंज
अदनानने ट्विटरवर याचा व्हिडिओ शेअर केलाय. यात तो पियानो वाजवण्यात मग्न झालेला दिसतो. अत्यंत मधुर अशी ट्यून वाजवता-वाजवता शेजारी असलेल्या बाटलीच्या कॅपवर तो हात मारतो आणि त्याची ट्यून संपते. त्याचा हा अनोखा बोटल कॅप चॅलेंज चाहत्यांना भावलाय.
अदनाने या पोस्टला कॅप्शन फार मस्त दिली आहे. त्याने लिहिलंय, '८८ कीज, १० बोटे, १ बाटली - नो प्रॉब्लेम'. विशेष म्हणजे त्याने परिधान केलेल्या काळ्या टी-शर्टवरही हीच कॅप्शन इंग्रजीत लिहिली आहे.