मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने कोविड - १९ सेफ्टी प्रॉक्ट्स लॉन्चच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. लॉकडाऊननंतर उर्वशी पहिल्यांदाच पत्रकारांसमोर भेटीसाठी आली.
सर्वसाधारणपणे बॉलिवूड सौंदर्यवतींना ब्युटी प्रॉडक्ट्सच्या लॉन्चिंगला बोलवले जाते. मात्र कोव्हिड-१९ च्या सेफ्टी प्रॉडक्ट्साठी अभिनेत्रीला बोलवण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात या प्रॉडक्ट्सची समाजाला खूप आवश्यकता आहे. यावेळी उर्वशीने तिच्या आगामी 'वर्जिन भानुप्रिया' बद्दलही भाष्य केले.