मुंबई -सर्वात जास्त विमानाने प्रवास करणाऱ्या महिला कलावंतांपैकी एक म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला. तिच्या एअरपोर्ट लूक्सची पण खूप चर्चा होत असते. नुकतीच ती एअरपोर्टवर चर्चेत आली पण वेगळ्या कारणासाठी. तिने मुंबई विमानतळावरील छायाचित्रकारांना लाडू वाटले. तिने तिरुमाला येथील देवस्थानाचा प्रसाद वाटून छायाचित्रकारांचे तोंड गोड केले. फिल्मस्टार्सना विमानतळावरून येताना-जाताना अनेक फोटोग्राफर्स आपल्या कॅमेऱ्यामध्ये ‘कॅच’ करीत असतात. उर्वशी रौतेला नुकतीच तिरुमाला मंदिरात गेली होती. तिथून परतताना तिने आठवणीने या सर्वांसाठी प्रसाद आणला. तिचे इन्स्टाग्रामवर ३४ दशलक्षाहून अधिक असून तिच्या प्रसादाच्या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडला आहे.
मुंबई विमानतळावर उर्वशी रौतेलाने छायाचित्रकारांचे केले तोंड गोड!
उर्वशी रौतेलाने मुंबई विमानतळावरील छायाचित्रकारांना लाडू वाटले. तिने तिरुमाला येथील देवस्थानाचा प्रसाद वाटून छायाचित्रकारांचे तोंड गोड केले.
हेही वाचा - सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती आली समोर
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला यशाची शिडी चढत आहे. उर्वशी बॉलिवूडमध्ये बॅक-टू-बॅक प्रोजेक्ट्स घेऊन येत आहे. काही महिन्यांपूर्वी उर्वशी ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. ती अलीकडेच अभिनेता मोहसिन खान सोबत ‘वो चाँद कहा से लाओगी’ या संगीत व्हिडिओमध्ये दिसली होती. त्याशिवाय तिने ‘तेरी लोड वे’ नावाचा आणखी एक म्युझिक व्हिडीओही केला आहे. उर्वशी रौतेला द्विभाषिक थ्रिलर ‘ब्लॅक रोझ’ चित्रपटातही दिसणार असून हा चित्रपट हिंदी व तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘तिरुत्तू पायले २’ या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधील तिच्या फर्स्ट लूकने जबरदस्त वादळ निर्माण केले होते. ही सुस्वरूप अभिनेत्री इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पातही दिसणार आहे.
उर्वशी रौतेलाने तिच्या आगामी जिओ स्टुडिओ आणि नेटफ्लिक्स सिरीज, ‘इन्स्पेक्टर अविनाश’ मध्ये रणदीप हूडासोबत दिसणार असल्याची घोषणाही केली आहे.