मुंबई- अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आपल्या सनसनाटी, सडेतोड आणि थेट बोलण्यामुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सध्या ती सिंगल रहाते. परंतु तिने आई होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ती एक बाळ दत्तक (adopting a child) घेणार आहे. यासाठी तिने आवश्यक कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे.
आपण बाळ दत्तक घेऊन आई बनणार असल्याची माहिती स्वतः स्वराने एका मुलाखतीत बोलताना दिली. देशात अनेक मुले अनाथ आहेत. पालकाविना जगणाऱ्या मुलांसाठी अनाथलयाचा आश्रय घ्यावा लागतो. आपल्याला असे मूल दत्तक घ्यायचे असल्याचे,स्वरा एका आघाडीच्या वृत्त संस्थेशी बोलताना म्हणाली.